Saturday, June 24, 2006

 

परमेश्वराची प्रज्ञा

महाराष्ट्र टाइम्स मधील दि.२४ जून २००६ तील ही बातमी पाहा.
"ना. म. जोशी मार्ग येथून मध्यप्रदेशात पळवलेल्या आकांक्षा अशोक खटावकर या साडेतीन वर्षाच्या मुलीने चाणाक्षपणे रेल्वे स्टेशनवर पोलिसांचे पाय धरून स्वतःच्या अपहरणाकडे लक्ष वेधल्याने मुलीची सुटका झालीच पण अपहरणकर्ती महिलाही पोलिसांना सापडली.
आकांक्षा शनिवारी आजी राधाबाईसोबत जवळच्या महापालिका दवाखान्यात गेली. आजी डॉक्टरांकडे गेली असता बाहेर बसलेल्या आकांक्षाला एका महिलेने पळवून नेले. आजींनी इतरांच्या मदतीने आकांक्षाचा शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. आकांक्षा अशी बेपत्ता झाल्याने कोल्हापुरातील तिच्या नातेवाईकांचा मुंबईत ओघ सुरू झाला.
आकांक्षाला पळवून नेणार्‍या तरुणीने तिच्यासह थेट मध्यप्रदेशातील नागदा स्टेशन गाठले. तिथे उतरताच आकांक्षाने या महिलेला तहान लागल्याचे सांगितले. पाणी आणल्यानंतर ते पितापिताच आकांक्षाने जवळच उभा असणा‍र्‍या पोलिसांना बघितले.
हातातील पाणी टाकून ती थेट पोलिसांकडे गेली आणि पायाला मिठी मारून रडू लागली. आकांक्षाचे बोबडे बोल त्या पोलिसाला समजले नाहीत. ती संकटात असल्याचा अंदाज मात्र आला. त्यांनी हालचाल करून त्या महिलेला ताब्यात घेतल्यावर आकांक्षाचे अपहरण नाट्य बाहेर आले. त्यांनी मुंबई पोलिसांशी संपर्क साधला असता आकांक्षा बेपत्ता असल्याचे कळले.
पोलीस आणि आकांक्षाचे काका चंद्रशेखर खटावकर मध्यप्रदेशला रवाना झाले. काकांना पाहून आकांक्षालाही रडू फुटले."

Thursday, April 27, 2006

 

Tryingout

I am still strugling.
I need to put more efforts.
Bloging I thouht was very simple.
Let me try try and try

Wednesday, April 26, 2006

 

suravat

This is my first attempt.
Gradually i intend to write matter only in devnagari script.
Let me see how it works.
Thank you all.

This page is powered by Blogger. Isn't yours?